विष्णुभट गोडसे वरसईकर

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर जवळ जवळ पूर्ण उत्तर आणि मध्य हिंदुस्तान फिरून प्रवासवर्णन लिहिणार्‍या विष्णुभटांना दैवयोगाने १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध अगदी जवळून बघायला मिळाले. त्यांनी ती सर्व हकिकत अगदी तपशिलाने लिहिली आणि त्यामुळेच आज आपल्याला त्या दिवसांची अगदी खात्रीलायक माहिती आज मिळत आहे.