अवलक्षणी बेत (कम इझी गो इझी)

"अवलक्षणी बेत" हा जेम्स हॅडली चेस या सुप्रसिद्ध रहस्य कादंबरीकाराच्या "कम इझी गो इझी" या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद आहे. एका नावाजलेल्या तिजोरी कंपनीत काम करणारा कथानायक चेट कार्सन व त्याचा खास मित्र एका कस्टमरच्या घरी चोरी करायचा बेत आखतो व तो काही कारणाने फसतो. व पोलिस चेट कार्सनला पकडतात.

एक तिजोरी कंपनीत काम करणारा आपला कथानायक चेट कार्सन हायवेवरच्या एका पेट्रोल पंपावर कामाला लागतो.
आणि सुरु होते एक थरार नाट्य.वयस्कर पेट्रोलपंप मालकाच्या सुंदर तरुण बायकोला -'लोला'ला- पाहून होणारी तडफड, त्या सुंदरीचा नवर्‍याच्या पैशावर असलेला डोळा आणि अचानकपणे घडलेला खूनी हल्ला. यात नायकाच्या सद्सद्विवेकबुद्धीची होणारी घालमेल. या सर्व वेगवान घटनांनी खिळवून ठेवणारे हे थरारनाट्य वाचकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.

फार्नवर्थ या कडेकोट बंदोबस्तातून चेट कसा पळून जातो, त्यानंतर हायवेवर एका पेट्रोलपंप मालकाशी कशी ओळख होते व त्याच्याकडे तो कसा कामाला लागतो. मध्यमवयीन मालकाची लोला अतिशय सुंदर बायको त्याला कशी मोहात पाडते व पैशाच्या मोहापायी कोणकोणते जीवघेणे प्रसंग चेट कार्सनवर ओढवतात व त्यातून तो सुटतो की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वाचा 'अवलक्षणी बेत'

अतिशय सुरेख आहे ही कादंबरी. जेम्स हॅडली चेस याला रहस्यकथांचा बादशहा का म्हणतात हे 'अवलक्षणी बेत' वाचल्यावर वाचकांना पुरेपुर पटेल :)

नक्की वाचा

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम