पक्षी जीवनांचे सर्व पैलू उलगडणारे
अद्भुत पक्षी विश्र्व
पक्षी निरीक्षक आणि विद्यार्थी-शिक्षक अशा सर्व अभ्यासकांसाठी डॉ. प्रतिभा सहस्त्रबुद्धे आणि डॉ. जयंत सहस्त्रबुद्धे या बुद्धीप्रधान लेखक द्वयींनी अद्भुत पक्षी विश्र्व हे पुस्तक लिहिले आहे. मराठी भाषेतील पक्षी विज्ञानावरील हे पुस्तक जनसामान्य शैक्षणिक विद्यार्थी तसेच पक्षी अभ्यासकांसाठी मौलव्यान आहे.
पक्षी शास्त्रातील प्रत्येक अंगाला या पुस्तकात स्पर्श केलेला आहे. पक्षांचे शरीरशास्त्र, त्यांची जीवन शैली, पक्षी उड्डाणाबद्दल तसेच स्थलांतराबद्दल सविस्तर चर्चा, देशोदेशीचे पक्षी, तसेच राज्य पक्षांची सूचि या पुस्तकात दिली आहे. दुर्मिळ पक्षी. त्यांचे संवर्धन तथा संरक्षणाबद्दल त्याच प्रमाणे पक्षांचे मानवाच्या आयुष्यात असलेले स्थान याबद्दल विस्तृत माहिती या पुस्तकात बघावयास मिळते. या 150 पानी पुस्तकात पक्षीजीवनाची भरपूर माहिती साधार व शास्त्रीय पण रंजक वाचनीय शैलीत दिली आहे.
अदभूत पक्षी-विश्व
भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २०१०
किंमत
140.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
141