तुक्याची आवली

आवलीला त्या घटनेचा पुरता अर्थ कळला. आणि ती विलक्षण चरकली. बुवांच्या टाळ-चिपळ्या बुवांशिवाय? आवलीनं टाहो फोडला. धनी ऽ ऽ ऽ! धनी ऽऽऽऽ! आणि ती बुवांच्या बौठकीवर कोसळली. त्या टाळ-चिपळ्या उराशी धरून तिनं आकांत मांडला. त्याच त्या टाळ-चिपळ्या ज्यांना बुवा आपले श्वास आणि उच्छ्वास म्हणत होते. त्याच टाळ-चिपळ्या आज बुवांपासून वेगळ्या एकट्या, पोरक्या, अनाथ होऊन बुवांच्या बौठकीवर पडल्या होत्या. अन् करपलेल्या काळजानं आणि चरकलेल्या मनानं त्याच टाळ-चिपळ्या उराशी धरून आवली आकांत करत होती. तिचा तो आकांत सगळ्या गावकर्यांचं काळीज चिरत गेला. आकाश फाडत गेला. विठ्ठल मंदिराच्या भिंती भेदत गेला. विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवत गेला. त्याच्या पायखालची वीट क्षणभर थरारली. इंद्रायणी क्षणभर वाहायचं विसरली. विठ्ठल मंदिराच्या कळसाला छेदत आवलीचा तो टाहो आकाश फाडत राहिला. नंतर कितीतरी वेळ त्याचे पडसाद आकाशातून येत राहिले. वाळवंटात कोसळत राहिले, विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभार्यावर आदळत राहिले

भाषा
मराठी
आवृत्ती
तिसरी
किंमत
150.00
पृष्ठसंख्या
196