बनगरवाडी

बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. माणदेश, मेंढके, त्यांची जीवनपद्धती याबद्दल सांगतानाच तिथल्या लोकांच्या निर्व्याजपणाचे चित्रणही अतिशय समर्थपणे यात येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. त्यामुळे हे वर्णन अगदी जिव्हाळ्याने येते. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५५ला आली. त्यानंतर नव्या आवृत्तीच्या निमित्ताने ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले.
या नव्या आवृत्तीत कथा आहे आणि त्याला पूरक अशी बनगरवाडीतल्या लोकांची रेखाटने. अजूनही सगळं ताजंतवानं, जिवंत वाटावं अशीच ही कलाकृती आहे.

भाषा
मराठी
आवृत्ती
२२, जुलै २००९
किंमत
80.00
पृष्ठसंख्या
132