रविंद्र गुर्जरांचे भाषांतर नसलेले व स्वतःच्या क्षेत्राशी संबंधीत व्यक्तीवरचे हे पुस्तक. स्वतः रविंद्र गुर्जर हे डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्वशाखेतुन डॉक्टरेट मिळवलेले. आणि हे पुस्तक आहे ट्रॉय शहराचा शोध घेणारा व आधुनिक उत्खनन शास्त्राचा प्रणेता ज्याला म्हटलं जातं त्या श्लीमानचे हे चरित्र आहे. जाईल तिथे सोने काढणार्या ह्या श्लीमानचे आयुष्यच इतके नाट्यमय आहे की लेखकाला वेगळी अशी नाट्यमयता आणावी लागलेली नाहि. गुर्जरांचे कष्ट दिसतात ते त्यांनी शोधलेल्या माहितीमधे.. एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील घडलेल्या ह्या चरित्रासाठी अनेक दस्ताइवज, पुस्तके, संदर्भ धुंडाळून त्यांनी हे चरित्र लिहिले आहे.. शेवटचा काहिसा तोचतोपणा सोडल्यास पुस्तक खिळवून ठेवणारे व चित्रदर्शी वर्णन करणारे (शिवाय नकाशे आणि छायाचित्रांनी युक्त असे) आहे.
भाषा
मराठी
किंमत
150.00
प्रकाशक