भारतात पक्षीविज्ञान या निसर्ग इतिहासतील अभ्यास शाखेला प्रामुख्याने डॉ. सलिम अली (मृत्यू: १९८७) यांनी लिहिलेल्या पक्षीविषयक ग्रंथांमुळेच चालना मिळाली. सामान्यांना समजेल अश्या भाषेत शास्त्रिय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमधे असते. डॉ. अली त्यापैकीच एक!
संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते भारतातच नाहि तर जगातील एक सर्वात प्रमुख पक्षीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर भारतातील व जगातील अनेक संस्थांनी पदव्यांचा पुरस्कारांचा वर्षाव केला आहे
लेखकाचे चित्र