कुरुक्षेत्रानंतर

भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग असणारं महाभारत ! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं तरीही मोहवणारं महाकाव्य ! 'धर्मयुद्धा'च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह, आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची जी होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्यं त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली. तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो. आणि मग... अनेक प्रश्नांची उकल होते आहे असं वाटत असतानाच वाचक परत नव्या प्रश्नांत गुरफटून जातो. 'महाभारत' समजावून घेताना त्याकडे नव्या दृष्टीकोनानं पहायला लावलं. वाचकाला वेढून टाकणारं... कुरुक्षेत्रानंतर.

भाषा
मराठी
आवृत्ती
१
किंमत
60.00
पृष्ठसंख्या
62