डॉ. अंजली कीर्तने ही एक झपाटलेली व्यक्ती आहे. डॉ. आनंदीबाई जोशी आणि
दुर्गाबाई भागवतांवरील त्यांचे लघुपट विलक्षण ताकदीचे आहेत.त्यांनी
'मोलियरचा मराठी नाटकांवरील प्रभाव' हा प्रबंध लिहिला आहे. प्रा. धोंड व
प्रा. कुलकर्णी यांच्यासोबत मराठी वाड्मय कोशाच्या संपादनाचे काम केलं.
काही वर्षे पॉप्युलर प्रकाशनात मराठी विभाग प्रमुखाचे काम केले; परंतु
त्यानंतर स्वतंत्र लेखनासाठी नोकरीचा राजीनामा दिला.