ओंजळीतील मोती

समाजासाठी अहर्निश झटणार्‍या निस्वार्थी कार्यकर्त्यांमुळे/व्यक्तींमुळे समाज जीवन निकोप राहत असते. सुरळीत चालत असते. असे कार्यकर्ते हे इतके प्रसिद्धीपासून दूर असतात की, अनेकदा आपल्याला त्यांची माहितीही होत नाही. ओंजळीतील मोती मध्ये अशा काही वेचक व्यक्तिमत्त्वांचा योग्य व नेमक्या शब्दात पण अत्यंत जिव्हाळ्याने परिचय करून दिला आहे मराठीचे प्रसिद्ध प्राध्यापक वक्ते प्राचार्य श्री. अरविंद खांडेकर यांनी. श्रद्धांजली, अभीष्ट चिंतन आणि मातृवंदना अशा तीन विभागातून वाहिलेली ही आदंराजली आपल्या सार्‍यांनाच प्रेरणादायी ठरेल आणि समाजमुखी ठरेल, यात शंका नाही.
महाराष्ट्र शासनाने उत्तम पुस्तकास उत्तेजन या योजनेअंतर्गत 2008 मध्ये निवडले असून त्याचा सूचीमधील अनुक्रम शिक्षक -27 हा आहे.
स्वयंसिद्धी या मुंबईच्या संस्थेने या पुस्तकास पुरस्कार दिला आहे.

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००६
किंमत
130.00
पृष्ठसंख्या
169