अग्निनृत्य

श्री मोहन आपटे यांचे "अग्निनृत्य" हे पुस्तक अणुबॉंब कसा बनला याची साद्यांत माहिती देते.

सर रदरफोर्ड यांनी अणु दिशा बदलतो, आणि केंद्रकात देखिल कसा फरक पाडतो हे सिध्द केल्यापासुन सुरुवात करुन आईनस्टाईन यांच्या E=mc(square) सुत्राने काय भुकंप घडवले तिथपर्यंत आणि जर्मनीच्या "ग्योटेन्गेज" विद्यापिठा पासुन ते जपानवर अणुबॉंब पडेपर्यंत व्हाया "मिशन लॉस-अलमॉस आणि मिशन अलसॉस" त्यांनी सगळं सविस्तर उलगडलय. किमान २२५ पानांच पुस्तक आहे. मराठीत तरि इतकि सुंदर-सहज-ओघवति भाषा घेउन अणुबॉंब बद्दल माहिती देणारं दुसरं पुस्तक नाही. पण बॅड न्युज अशी आहे कि सध्या ते आउट ऑफ प्रिंट असल्याने बाजारात ते मिळत नाहिये.

(साभारः सौरभ वैशंपायनकडून मिसळपाव.कॉमवरील लेखातून)

भाषा
मराठी